बाजी प्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोचले. पुण्यात लाल महालात शाहिस्तेखान घुसला होता. त्याच्या फौजा पुण्याची बरबादी करीत होत्या. शाहिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावणे हे आता शिवाजी महाराजांसमोरील तातडीचे काम होते.
त्यांनी त्यासाठी एक धाडसी योजना आखली. प्रत्यक्ष खानाच्या छावणीत शिरून त्याची गर्दन छाटण्याचे त्यांनी ठरविले. काही लाख सैनिक असलेल्या छावणीत शिरून,लाल महालासाराख्या सुरक्षित जागी बसलेल्या खानची गर्दन उडविणे हे काही ेसोपे काम नव्हते.
निवडक दोन हजार स्वरांची कुमक घेऊन स्वत: शिवाजी महाराज या मोहिमेवर निघाले. बिनीवर बाबाजी आणि चिमणाजी हे खेडचे देशपांडेकुलकर्णी (CKP) भाऊ आणि त्यापाठोपाठ खासा राजर्षी होते. त्यांच्यामागून नेताजी पालकर आणि मोरोपंत पेशवे होते. बाबाजी आणि चिमणाजी यांचे वडील बापुजी देशपांडे हे महाराजांच्या बालपणी लाल महालात चाकरी करीत होते. त्यामुळे बाबाजी/चिमणाजी हे महाराजांची बालमित्र..अगदी जानी दोस्त. त्यांना पुण्याची आणि लाल महालाची अगदी खडानखडा माहिती होती. नेताजी पालकर आणि मोरोपंत पेशवे यांच्या नेतृत्वाखाली दोन तुकड्यात विभागणी करून हे स्वार छावणीत घुसले.
सर्वात पुढे बाबाजी आणि चिमणाजी होते. त्यांची कामगिरी सर्वात कठीण होती. जागोजागी चौकी पहारे होते. त्यांना या बंधूंनी ते चौकी पहारा सांभाळणारे मोगल सेनेतील लोकच आहेत हे पटवून दिले. बाबाजी आणि चिमणाजी यांनीच आपापल्या तुकडीला लाल महालात पहारे चुकवून आत घुसविले.
मुदपाकखान्यातून खानाच्या शामियान्याकडे जाण्याचा रस्ता होता. पण तो विटांनी बंद केला होता. त्या विटांची भिंत फोडून जावे लागले. त्यामुळे आवाज होऊन खानाला कोणीतरी शिरल्याचा पत्ता लागला. तेवढ्यात कोणा बेगमेने दिवे घालविले. त्यामुळे अंधारात खान पळून जाऊ लागला. पण या झटापटीत शिवाजी महाराजांच्या तलवारीने खानाची तीन बोटे तुटली. शिवाजी महाराजांचे सैन्य पळून गेले.
यामुळे घाबरून खानाने आपला मुक्काम हलविला आणि तो दिल्लीला पळून गेला.
बाबाजी आणि चिमणाजी देशपांडे यान CKP बंधूंची कामगिरी या लढाईत अत्यंत मोलाची होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रात या बंधूंची खूप स्तुती केली आहे.

No comments:
Post a Comment