शिवाजीमहाराजांनी अफझलखान या आदिलशाही बलाढ्य सरदाराला ठार मारले. या प्रसंगातही एका CKP बहाद्दराने कळीची भूमिका बजावली होती.जावळी हातात आल्यावर शिवाजी महाराजांनी लगेचच तेथे प्रतापगड किल्ला बांधला. त्यानंतर आदिलशाही आणि निजामशाहीतील किल्ले हस्तगत करीत सुटले. याच सुमारास मुहम्मद अदिलशहाचा मृत्यू झाला. अदिलशहाची आई बडी बेगमा हिच्या हातात सत्ता आली. बडी बेगमा ही पाताळयंत्री बाई होती. शिवाजीमहाराज आदिलशाही मुलुखात गोंधळ घालीत असल्यामुळे ती खवळली होती. आदिलशाही दरबारात अफझलखान हा शूर सरदार होता. प्रत्यक्ष औरंगजेब त्याच्या तावडीतून एकदा दैवयोगाने निसटला होता. शिवाजीमहाराजांना दगा करून ठार मारण्याचा गुप्त हुकुम अफझलखानाला मिळाला होता. त्याच्याबरोबर बाराशे उंट, पासष्ठ हत्ती, असंख्य तोफा, पालख्या, भोई, नोकर-चाकर आणि शूर सरदाराना शिवाजीमहाराजांच्या पारिपत्य करण्याच्या मोहिमेवर धाडण्यात आले. मोठा खजिना त्यासाठी देण्यात आला. तीन वर्षे पुरेल एवढा खजिना बरोबर होता. जावळीच्या खोऱ्याची खडानखडा माहिती असलेला, जावळीच्या लढ्यातून वाचलेला चंद्रराव मोरे हा ही या सरदारांमध्ये होता. शहाजीराजांचा चुलत भाऊही या मध्ये होता.
अफझलखान स्वभावाने क्रूर होता, धर्मवेडा होता. शिवाजीमहाराजांवर स्वारी करण्यापूर्वी त्याने तुळजापूरयेथे मंदिरे उध्वस्त केली. तुळजाभवानीवर घाव घातले.
शिवाजी महाराजांनी अफझलखानास भ्यायल्याची बतावणी करीत जावळीच्या निबिड अरण्यात अवजड सैन्यासह बोलाविले. नंतर त्यांच्या अफझलखानाबरोबर झालेल्या भेटीत आलिंगन देण्याच्या बहाण्याने अफझलखानने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज सावध होते. त्यांनी कपड्याआड चिलखत घातले होते. त्यांनी लपवून सोबत नेलेल्या वाघनखांच्या (एक शस्त्र) सहाय्याने खानाचा कोथळा बाहेर काढला.
या सर्व घडामोडीत पडद्यामागे एक CKP बहाद्दर आपली कामगिरी बजावत होता. 'विश्वासराव नानाजी दिघे' हे त्याचे नाव. विशासराव हे शिवाजीमहाराजांच्या हेरखात्याचे त्यावेळी प्रमुख होते. त्यांचे फारसी भाषेवर प्रभुत्व होते. आपले हेर त्यांनी वाई-प्रतापगड परिसरात खानच्या छावणीत पेरून ठेवले होते. खानच्या सैन्याच्या प्रत्येक हालचालीची खबर ते शिवारायापर्यंत पोचावीत होते.ते स्वत: फकिराच्या वेशात खानच्या छावणीपरिसरात फिरत होते. त्यांनीच खान काहीतरी दगाफटका करण्याच्या विचारात असून त्यामुळे भेटीच्या वेळी सावध राहण्याची सुचना महाराजांना केली होती.
तिमाजी प्रभू वैद्य आणि बाजी प्रभू देशपांडे हे शूर CKP सरदारही अफझलखान लढाईत शिवरायांबरोबर होते.
No comments:
Post a Comment