शिवाजी महाराजांच्या इतिहासात जावळीच्या लढाईला अनाण्यासाधारण महत्व आहे.
जावळी हे महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड यांच्या पहाडात वसलेले अत्यंत सुरक्षित असे संस्थान होते. अवध्याव्य पहाड, अत्यंत दाट झाडी हे जावळीचे वैशिष्ट्य. वाघ, अस्वले, चित्ते यांचा तेथे स्वैर संचार होता. येथे राज्य करायला वाघाचेच काळीज हवे. अशा या जावळीत मोऱ्यांचा पिढ्यानपिढ्या अंमल होता. ते स्वत:ला आदिलाशाहाचे सरदार म्हणावीत. 'चंद्रराव' हा मोऱ्यांना मिळालेला पिढीजात किताब होता.
या मोऱ्यांना आणखी हाव सुटली. गुंजणखोऱ्याच्या आणि रोहीडखोऱ्याच्या काही प्रदेशावर ते आपला हक्क सांगू लागले. मुसे खोऱ्यातल्या रागो त्रीमाल वाकडे या कुलकर्ण्याने एका विधवेशी गैरकृत्य केले, त्याला चंद्रराव मोऱ्याने पाठीशी घातले. स्वराज्यातील रोहीडखोर्यातील चिखलीच्या पाटलाला आणि त्याच्या मुलाला चंद्ररावाने ठार मारले. यामुळे शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करण्याचे ठरविले.
परंतु जावळी आजवर अजिंक्य होता. कोणीही दाट जंगलात पहाडात वसलेल्या जावळीवर चालून जाण्याचे धाडस केले नव्हते. शिवाजी महाराजांनी या धाडसी मोहिमेसाठी 'रघुनाथ बल्लाळ कोर्डे' यांची मोहिमेचे प्रमुख म्हणून निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जावळीच्या संग्रामात हनुमंतराव मोरे मारला गेला. यशवंतराव मोरे रायरी किल्ल्यावर पळाला. प्रतापराव मोरे निसटून आदिलशहाच्या दरबारी मदत मागण्यास गेला. ही मोहीम फत्ते झाल्यावर शिवाजी महाराज स्वत: दोन महिने जावळीस मुक्काम ठोकून होते.
या लढाईत आबाजी विश्वनाथ प्रभू यांनी अतुलनीय शौर्य दाखविले. तसेच मोऱ्यांकडील एक झुंजार योद्धा मुरार बाजी देशपांडे याला शिवाजी महाराजांबरोबर येण्यास मन वळविले. बाजी प्रभू देशपांडे यांनीही जावळीच्या लढाईत पराक्रम गाजविला.
या लढाईनंतर शिवाजी महाराज यशवंतराव मोरे यांचा पाठलाग करीत रायरी किल्ल्यावर गेले. रायरी हस्तगत करून त्याचे नाव रायगड असे केले. शिवाजी महाराज यांनी यानंतर कोकण विभागाकडे मोर्चा वळविला. कोकण विभागाची व्यवस्था पाहण्यास मल्हार नारायण चौबळ यांची नेमणूक केली. जंजिरा किल्ल्याजवळ 'कांसा' किल्ला बांधण्यास त्यांनी चौबळ यांना सांगितले. मल्हार नारायण चौबळ यांनी हे काम यशस्वी रीत्या पार पाडून कोकण किनाऱ्यावरील सिद्दीच्या हालचालींना लगाम घातला.

No comments:
Post a Comment